सरकारने फोडाफोडी खाते तयार करून मंत्रिपद गिरीश महाजनांना त्याचे मंत्री करावे ; अजित पवारांचा खोचक टोला

मुंबई–ग्लोबल न्यूज नेटवर्क
काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांचा प्रवेश घडवून आणण्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. यावर आज (रविवार) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप सरकारने एक फोडाफोडी खाते काढावे आणि त्याचे मंत्रीपद गिरीश महाजन यांना द्यावे, असा टोला  
लगावला.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या  पत्रकार परिषद पवार बोलत होते.

ते म्हणाले की, विरोधी पक्षातील आमदारांना फोन करून फोडाफोडी केली जात आहे. लोकशाहीत हे कितपत योग्य आहे?  लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष जिवंत राहिला पाहिजे. पण त्यालाच यांनी गालबोट लावले आहे, अशी टीका अजित पवारांनी यावेळी केली. दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.

धिरज करळे: