आता आरएसएस प्रमुख ही ट्विटरवर, वाचा एकाच दिवसात काय झाले ते

नवी दिल्ली । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवार सकाळी प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एंट्री केली आहे. मोहन भागवतांनी ट्विटरवर अधिकृतरीत्या एंट्री केली.

सरसंघचालकांनी अद्याप कोणतेही ट्विट केलेले नसले तरी अत्यंत कमी वेळेत त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यांनी ट्विटरवर प्रवेश करताच विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
मोहन भागवतांचे ट्विटर अकाउंट @DrMohanBhagwat असे आहे.

विशेष म्हणजे, ट्विटरवर केवळ सरसंघचालकच नव्हे, तर संघातील अनेक दिग्गज चेहरे आले आहेत. यामध्ये सह-सरकार्यवाह सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, अरुण कुमार, अनिरुद्ध देशपांडे यांचा समावेश आहे. या सर्वांनी सोमवारी एकत्रच ट्विटरवर प्रवेश केला असून अद्याप कोणीही ट्विट केलेले नाही.

ट्विटरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यापूर्वीच अकाउंट आहे. यावरून संघाची अधिकृत घोषणा अथवा मोहन भागवतांचे वक्तव्य शेअर केले जायचे. आता सरसंघचालक स्वत: ट्विटरवर आले आहेत. मागच्या काही काळापासून आरएसएसतर्फे जनतेशी थेट संपर्क आणि प्रतिमा बदलाचे प्रयत्न सुरू आहेत. गतवर्षी मोहन भागवतांनी दिल्लीच्या विज्ञान भवनात एका कार्यक्रमाला संबोधित केले होते, ज्यात सलग तीन दिवस संघातर्फे देशातील अनेक वर्गांतील लोकांशी थेट संवाद साधला होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: