आठवीतील पूनम देशमूख बनली जिल्हाधिकारी ;वाचा सविस्तर

बुलढाणा | महिला सशक्तीकरणाच्या उद्देशाने 8 मार्च जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या निमित्त आज 2 मार्चला पाडळी येथे सरकारी शाळांमध्ये 8 वी इयत्तेत 98 गुण मिळवणाऱ्या पूनम देशमूखला एक दिवस जिल्हाधिकारी होण्याचा मान देण्यात आला. हा सांकेतिक प्रभार तिला सोपवून सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसवण्यात आले. यावेळी तिच्यासमोर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा व प्रशासकीय अधिकारी बसले होते. यावेळी पूनमने स्त्री शिक्षणासाठी भविष्यात प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला.

प्रशासन लोकाभिमुख व्हावे, प्रशासकीय कामाला सामाजिकतेची जोड मिळावी यासाठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा नवनवे प्रयोग राबवत असतात. त्या महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 2 ते 8 मार्च दरम्यान महिला सप्ताह राबवत आहेत. त्या अनुषंगाने गुणवत्ता प्राप्त विद्याथींनीना एक दिवसासाठी जिल्हाधिकारी बनविण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.

बुलडाणा जवळच्या पाडळी गावातील पूनम देशमूखने जिल्हाधिकारी होण्याचा पहिला मान आज मिळाला. तिला इयत्ता 8 वीमध्ये सर्वाधिक 98 टक्के गुण मिळाले. पूनमला प्रशासकीय सेवेमध्ये यायचे आहे. मुलींचे लहान वयात लग्न केले जाते. याला पूनमचा विरोध आहे. मूलींच्या शिक्षणासाठी कार्य करण्याची इच्छा पूनमने व्यक्त केली आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, भूषण अहिरे, डॉ.आर.जी. फटी, निलेश तायडे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: