आज ट्रोल करणारे माझे काम बघून माझे कौतुक करतील-रोहित पवारांचे ट्रोलर्स ना उत्तर

पुणे | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू तसेच पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. मात्र कोणत्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील हे त्यांनी सांगितले नव्हते. वरिष्ठ सांगतील तेथून आपण निवडणूक लढवणार असल्याचं रोहित पवार म्हणाले. मात्र पवारांच्या नातवाने विधानसभेत जाण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर सोशल मीडियातून त्यांना ट्रोल करण्यात आले. आता त्यांनी ट्रोल करण्याऱ्यांना टोला लगावला आहे. आज ट्रोल करणारेच माझं काम बघून माझं कौतुक करतील असे ते म्हणाले.

ट्रोलर्सविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले की, अलीकडील काळात पेड ट्रोलर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे अशा ट्रोलर्सकडे आपण लक्ष देणार नाही. कारण आपल्याला राजकारणात सक्रिय व्हायचे. आज जे ट्रोल करतायत तेच नंतर आपल्या कामाबद्दल कौतुक करतील असेही ते म्हणाले.

बारामती तालुक्यातील 30 गावांनी पानी फाउंडेशनच्या वतीने वाटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. यामधील 15 गावांमध्ये महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहित पवारांनीही श्रमदान केले. तेव्हाच पत्रकारांशी बोलताना त्यांनी विधानसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मतदारसंघ हा वरिष्ठ जे सांगतील तो निवडू असेही ते म्हणाले होते. आतापर्यंत मी सामाजिक जीवनात कार्यरत असताना अनेक भागात काम करत आहे. त्यामुळे पक्षाकडून जिथे संधी मिळेल तिथून निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे असे रोहित पवार म्हणाले.

admin: