ग्लोबल न्युज परिवारातील सर्व वाचकांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा..!

वैशाखशुक्लतृतीयेला अक्षय्य तृतीया असे म्हटले जाते. हा दिवस शेतीच्या कामाला सुरुवात करण्याचा दिवस म्हणून महत्त्वाचा समजतात. या दिवशी नवीन कामे, व्यवसाय यांची सुरुवात करण्याची पद्धत आहे, हा उत्तम मुहूर्ताचा दिवस आहेच.

अखंड, क्षय नाही अशी तिथी म्हणजे अक्षय्य तृतीया….. या दिवशी चांगले काम सुरू केले तर अखंडपणे सुरू राहते असे म्हणतात. साडे तीन मुहूर्ताचे दिवस मानले आहेत, त्यापैकी हा दिवस – अर्धा मुहूर्त आहे. दान, होम करणे आणि पुण्य मिळवणे या गोष्टी माणसाने या दिवसाशी जोडल्या आहेत. जे आहे ते साठवण्यापेक्षा दिल्याने आणखी मिळवता येईल असे या दिवसाचे महत्त्व पूर्वीपासून सांगितले गेले आहे.

अक्षयतृतीयाच्या हार्दिक_शुभेच्छा ! 🌺 🙏रामकृष्णहरि🚩🚩

admin: