आज जागतिक थॅलसेमिया दिन, जाणून घ्या थॅलसेमिया आजाराविषयी

मे ९ हा दिवस जागतिक थॅलसेमिया दिन म्हणून पाळला जातो.

थॅलसेमिया ही एक आनुवंशिक अशी समस्या आहे, ज्यामध्ये लाल रक्‍तपेशी कमी होतात, आणि मग रक्‍तातील 
हिमोग्लोबिनचे प्रमाणसुद्धा सर्वसाधारण स्तरापेक्षा कमी होते. यामुळे मग पंडुरोग होतो, ज्याचे गांभीर्य हे म्युटेशनवर (आनुवंशिकतेवर) अवलंबून असते. ही समस्या जागतिक स्तरावर सगळ्यात सामान्य अशी आनुवंशिक समस्या आहे. म्युटेशनच्या प्रकारांचा विचार करता जगभरात 200 प्रकार आढळून येतात. ज्यातील 26 भारतात आढळून आलेले असून त्यातील 5 प्रकार हे सर्वसाधारणपणे दिसून येतात. हे पाच प्रकार जगभरात सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या इथेच आढळतात.

या आजाराबद्दल जनसामान्यां- मध्ये जागरूकता निर्माण करताना हे सुद्धा समजावून सांगणे महत्त्वाचे आहे, की ह्या आजारावरती प्रतिबंधसुद्धा घालता येऊ शकतो. थॅलसेमियाकरिता जबाबदार असणाऱ्या म्युटन्ट गुणसूत्र नुसार त्याचे वर्गीकरण हे मेजर आणि मायनर या दोन वर्गात करता येते. मेजर म्हणजे अशा व्यक्ती ज्यांना थॅलसेमिया आहे आणि मायनर म्हणजे त्यांच्यात आजाराचे वाईट गूणसूत्र आहे, जे त्यांच्या मुलांमध्ये पुढे येऊ शकते.

लग्न करण्याआधी म्युटन्ट गुणसूत्र आहे का? ह्याची तपासणी केल्यास थॅलसेमिक बाळाचा जन्म होण्यावरती रोक लावता येऊ शकते. ही चाचणी लग्नाआधीचा एक विधी म्हणून बंधनकारक करावी आणि कोणत्याही जाती किंवा संस्कृतीमधील कुटुंबांनी त्याचा स्वीकार करायला हवा. ह्याशिवाय, म्युटन्ट असलेली जोडपी सुद्धा एका सामान्य रक्त तपासणीमुळे
थॅलसेमिक बाळाच्या जन्मावर रोक लावू शकतात.

समजा दोघांनाही (स्त्री आणि पुरुष) 25 टक्‍के थॅलसेमिया मायनर असला तर त्यांच्या बाळाला थॅलसेमिया होतो. 10 आठवड्यात केल्या जाणाऱ्या ऍन्टी-नेटल रक्त चाचणीमुळे बाळाला थॅलसेमिया आहे की नाही हे समजू शकते. थॅलसेमियाकडे उपचाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघितले पाहिजे. थॅलसेमिया झालेले मूल, वैद्यकीय उपचारांच्या मदतीने एक सामान्य आयुष्य जगू शकते; पण त्याची तीव्रता आणि आयुष्यभर मिळणारी उपचारपद्धती ही त्याच्या स्वास्थ्य आणि उत्पादकतेवरती परिणाम करू शकते. सगळीकडे उपलब्ध असणाऱ्या या सामान्य प्रतिबंधनात्मक बाबी असल्या तरी सुद्धा जगभरात थॅलसेमियाचे प्रमाण वाढतच जाते आहे. भारतभरात ह्याची संख्या ही 2 ते 14 टक्‍के दरम्यान आढळून येते. सामान्यपणे दर वर्षाला देशात 10,000 पेक्षा अधिक मुलं थॅलसेमिया घेऊन जन्माला येतात. थॅलसेमिया असलेल्या मुलाला जीवन हे एक आव्हानच असते.

म्युटेशनच्या प्रतिबंध करण्याऱ्या मुद्द्यांवर उपलब्ध असणाऱ्या ह्या सामान्य बऱ्याच प्रकारात त्यांना आयुष्यभर रक्त चढवण्यास सामोरे जावे लागते. काही मुलांना तर वयाच्या 6व्या किंवा 7 व्या महिन्यातच रक्त द्यावे लागते; तर काही जण 12 ते 13 व्या वर्षापर्यंत ते यापासून लांब राहू शकतात. पण आधी काय किंवा नंतर काय जगण्याकरिता या मार्गांचा अवलंब करावाच लागतो; आणि ह्यामुळे त्यांचा त्रास कमी होतो. नियमित रक्त घेतल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते; आणि मग ऊतींमध्ये अती प्रमाणात लोह जमा झाल्याने, उपचाराच्या अभावी मृत्यूसुद्धा होण्याची शक्‍यता असते. ह्या सगळ्याचा शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे दुसऱ्या पंक्तिमधील गुंतागुंती होऊ शकतात.

admin: