आजची गर्दी भविष्याची दिशा बदलणार -पंकजा मुंडे

सावरगाव | महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आज पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाहांची विशेष उपस्थिती होती. या मेळाव्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. तेव्हा आजची गर्दी भविष्याची दिशा बदलणार असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

तुमच्या दारात सेवा करता यावी यासाठी मी कार्य करत राहणार आहे. मी आयुष्यभर तुमची करत राहिल. शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा स्वाभीमान मी टीकवून ठेवेल. गोपीनाथ मुंडेंनी जे काम केले पुढे नेत काम करेल. सावरगाव हे आमच्यासाठी चेतनाभूमी असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. याविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, अमित शाह आज भगवानबाबांच्या जन्मभूमीत आलेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात आणखी मोठे सिमोल्लंघन केले जाणार आहे.

पंकजा मुंडेंनी कलम 370 चा उल्लेखही आपल्या भाषणात केला. अमित शाह यांनी कलम 370 हटवून आपल्याला न्याय दिला. देशभक्तीने सर्वांना एकत्र आणले आहे. असे त्या म्हणाल्या. यावेळी अमित शाहांना 370 तोफांची सलामी देण्यात आली.

पंकजा मुंडेंनी उसतोड कामगारांच्या विषयावरही बातचित केली. उसतोड कामगारांसाठी यापुढे पावलं उचलली जाणार असल्याच्या पंकजा मुंडे म्हणाल्या. माझ्या भावांच्या हाती कोयता घेण्याची वेळ येऊ देऊ नका. आपलं नातं हे कधीच तुटणारं नसल्याचंही त्या म्हणाल्या. गोपीनाथ मुंडे यांनी जे काम हाती घेतले आहे ते काम आता मला पुढे न्यायचं आहे. जे कोणालाही शक्य नव्हतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी करून दाखवले आहे.

आज माझ्या कामाचं जे कौतुक केलं त्यामुळे मला कशाचीही अपेक्षा नाही. तुमच्या मान सन्मानासाठी काम करायचं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मला साथ दिली. त्यामुळे तुमच्या दारात सेवा यावी यासाठी काम करायचं आहे. असे पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या.

ग्लोबल न्युज नेटवर्क: