अर्थसंकल्पा पूर्वीच मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट…

दिल्ली: अर्थसंकल्प २०१९ पूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने खरीप पिकांचा एमएसपी वाढवला आहे. आर्थिक विषयांवरील कॅबिनेटच्या बैठकीत खरीप पिकांवर एमएसपी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने सोयाबीनवरील एमएसपी ३११ रुपयांनी वाढवून ३३९९ रुपयांवरुन ३७१० रुपये प्रति क्विंटल केली आहे. तर उडीद डाळीचा एमएसपी १०० रुपयांनी वाढवला आहे. उडीद ५६०० ते ५७०० रुपये प्रति क्विंटल केले आहे. तूरडाळ ५६७५ वरुन ५८०० रुपये प्रति क्विंटल केले आहे. तर धानवरील एमएसपी १७५० वरुन १८३५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे.

याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी याबाबत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी एमएसपीत वाढ केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यांनी टि्वट करत म्हटले की, मी मोदींचे आभार मानते. त्यांनी शेतकऱ्यांना दिलेले वचन पाळले आहे. त्यांनी धान आणि कापूसवरील एमएसपी ६५ रुपये आणि १०५ रुपये प्रति क्विंटलने वाढवली आहे. एमएसपीमध्ये केलेल्या वाढीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: