अमित शाह आज बिहारमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार, राजकारणातील व्हर्च्युअल सभांचा नवा प्रयोग

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून आज आगामी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजल एक व्हर्च्यअल रॅली घेणार असून त्यासाठी बिहारच्या सर्व जिल्ह्यात मिळून तब्बल 72 हजार एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. या रॅलीपासून राजकारणातील व्हर्च्युअल सभांचा नवा प्रयोग सुरू करण्यात आला आहे.

भाजपने आज सायंकाळी 4 वाजता बिहारमध्ये ‘बिहार जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात अमित शहा जनतेला संबोधित करणार आहेत. अमित शहा यांचे भाषण 2 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचेल अशी सोय करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांना स्मार्टफोनवर ही रॅली बघता येण्याची सोय करण्यात आली आहे.

बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरिस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याच्या प्रचाराला सुरुवात करण्यासाठी अमित शहा यांच्या व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: