माणुसकी जपणारा
प्रशासकीय अधिकारी
सोलापूर: सोलापुरातील ज्येष्ठ वकील चंद्रकांत देशमुख यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुखद अनुभव आला. ते आपल्या कामासाठी पत्नीसह सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना प्रत्यक्ष भेटून समस्या कानावर घालायची होती. पण पहिल्या मजल्यावरील जिल्हाधिकारी यांच्या दालनांत जावे कसे, असा प्रश्न समोर होता. त्यांच्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना कळाले. श्री. देशमुख यांची समस्या समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी भोसलेच दालन सोडून खाली आले. त्यांनी श्री. देशमुख यांची समस्या समजून घेऊन लवकरच समस्या निराकरण केली जाईल, असे आश्वासित केलें. जिल्हाधिकारी भोसले यांच्या वागणुकीने श्री. देशमुख आणि त्यांच्या पत्नी सद्गगदीत झाल्या होत्या.
जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले हे लोकाभिमुख कामासाठी सतत आग्रही असतात. तसेच ते कामानिमित्त त्यांच्याकडे आलेल्या माणसाचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतात. त्यांच्या शंकेचे निराकरण करतात. त्यांचा कामाचा व्याप ही तसाच आहे.20-20तास सलग बैठका घेतात.