स्व. सुशिल-शीतल राऊत यांच्या स्मरणार्थ 416 रक्तदात्यांचे रक्त दान
बार्शी: स्व सुशिल व शीतल राऊत यांच्या स्मरणार्थ गेल्या सात वर्षांपासून स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते या ही वर्षी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये ग्रामीण भागातील व शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक व व्यापारी तसेच विद्यार्थी व महिला व इतर सर्व स्तरातील रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन 416 रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धांजली वाहिली.
या राऊत बंधूंचे 2012 साली अपघाती निधन झाले पण त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींशी असलेले नातेसंबंध व त्यांनी जोडलेली नाळ टिकवण्याचं काम मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठान गेल्या सात वर्षापासून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे या रक्तदान शिबिरात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते सहभागी होत आहेत गेल्या सात वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी विक्रमी 416 रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये साधारणपणे तेवीस महिलांनी व एकत्रित 10 जोडप्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरासाठी जय शिवराय प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने गेल्या एक महिन्यापासून अथक परिश्रम घेतले जात होते.
या रक्तदान शिबिरास प्रतिष्ठित मान्यवरांनी देखील भेटी दिल्या यामध्ये आमदार राजेंद्र राऊत, डी वाय एस पी डॉ सिद्धेश्वर भोरे साहेब, नगराध्यक्ष असिफ (भाई) तांबोळी, डॉ सुनिल फटाले, डॉ निलिमा फटाले ,युवा नेते अभिजीत राऊत त्याचबरोबर प्रतिष्ठित व्यापारी पत्रकार बांधव व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.