अजित पवारांचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘आमचं आधीच ठरलेलं होतं’

मुंबई | सध्या राजकीय भूकंप आला आहे. अजित पवारांनी बंड करत भाजपला साथ देत सत्ता स्थापन केली. आता त्यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आधीच ठरले होते. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. मात्र आता मोठे मोठे नेतेही मला खोटं ठरवत असल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तर सामान्य नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत भाजपला पाठिंबा दिला. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राजकीय गोंधळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांच्या निर्णयाशी कोणताही संबंध नसल्याचे वारंवार स्पष्ट करण्यात येत आहे. दरम्यान अजित पवार गौप्यस्फोट करताना दिसत आहेत. अजित पवार यांनी बारामतीच्या कार्यकर्त्यांसमोर आपण भाजपला का पाठिंबा दिला याबाबत गौप्यस्फोट केला.

अजित पवार यांना भेटायला गेलेल्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांना याविषयी माहिती दिली. भाजप आणि राष्ट्रवादीचे अगोदरच ठरले होते. त्यासंदर्भात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकाही करण्यात आल्या होत्या. पण, मला आता शब्द फिरवायला सांगितला जातोय, असे अजित पवारांनी सांगितले असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: