अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा

शिर्डी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे याने भाजपमध्ये प्रवेश करून नगरमधून उमेदवारी मिळवल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविषयी अनेक तर्कवितर्क वर्तविले जात होते. अखेर त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विखे-पाटील यांचा राजीनामा स्वीकारला आहे. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

काँग्रेसचे अहमदनगरचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. मुलाच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखेही भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींनी विखे-पाटील यांचा राजीनामा स्वीकारल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. विखे-पाटील आता भाजपमध्ये जाणार चर्चा आता रंगली आहे.
उदय अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहुल गांधी यांची प्रचरसभा होत असून या सभेला विखे पाटील अनुपस्थित राहणार

admin: