सकल जैन समाज भागवणार बार्शीकरांची तहान तालुक्यात मोफत पाण्याचे टँकर


बार्शी :
येथील श्री भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक समितीच्या वतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यात गरजेनुसार मोफत पाण्याचे टँकर उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. जैन मुनी गुरूदेव ओंकारेश्वर म.सा.आदी ठाणा यांच्या अम्रतहस्ते मंत्रोच्चार करून, तहसिलदार ऋषिकेत शेळके यांच्या हस्ते या टँकरचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी कमलेश मेहता, प्रदिप बागमार, बाळासाहेब तातेड, अजित कुंकूलोळ, भरतभाई वखारिया, नगरसेवक प्रशांत कथले, अॅड.दिनेश श्रीश्रीमाळ, बाळासाहेब श्रीश्रीमाळ, गोविंद बाफणा, किशोरभाई शहा, धन्यकुमार शहा, पवन श्रीश्रीमाळ, सुभाष लोढा, संदिप सुराणा, सतिश जाजू, समीर सुराणा, अमित कटारिया, सचिन बागमार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

admin: