अखेर राऊत तळ्यात बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी आले

बार्शी शहरातील राऊत तळे याठिकाणी पाणी सोडण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ

बार्शी: भाजपा नेते माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नांमुळे बार्शी उपसा सिंचन योजनेत पाणी सोडण्यात आले. या पाण्यातून बार्शी शहर व तालुक्यातील अनेक पाण्याचे तलाव,बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. त्यापैकीच एक असलेल्या बार्शी शहरातील कांदलगाव रोडवरील राऊत तळ्यामध्ये पाणी सोडण्यासाठी माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी यांच्या शुभहस्ते पाणी सोडण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पक्षनेते विजय नाना राऊत ,बाळासाहेब पवार,महादेव राऊत,गटनेते दीपक राऊत,नगरसेवक भैय्या बारंगुळे काकासाहेब फुरडे ,विजय चव्हाण,कय्युम पटेल,मदन गव्हाणे,तानाजी मोरे,किरण भालके,उदय पवार, महेश देशमुख चंदु वाणी,अस्लम शेख, मुन्ना काझी,धनंजय जाधव,विष्णू बारंगुळे बापु गायकवाड, विष्णू राऊत,रामराव राऊत या भागातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
बार्शी शहरातील कसबा पेठ व या भागातील अनेक गाय,म्हशी इत्यादी दुभते जनावर पशुपालक बांधव व शेतकरी यांच्या मागणीवरून याठिकाणी पाणी सोडण्यात आले.येत्या दोन दिवसांत राऊत तळे या ठिकाणी हे पाणी मी भरेल, जेणेकरून या पाण्याचा लाभ या भागातील दुभते जनावरे व शेतकऱ्यांना होणार आहे.या पाणी सोडण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ केल्यामुळे या भागातील शेतकरी व पशुपालक शेतकरी यांच्यामधून समाधान व आनंद व्यक्त होत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: