अखेर महसूल प्रशासनाने वकिलांच्या मागण्या केल्या मान्य,उपोषण थांबवले.आजी माजी आमदारांनी केली मध्यस्थी

हिंदू एकत्र कुटुंब जमिनी तडजोड नोंदी न घेण्याच्या निषेधार्थ बार्शीतील वकीलांनी आज 15 ऑगस्ट रोजी सुरू केले होते आमरण उपोषण

बार्शी: बार्शी तालुक्यातील एकत्र हिंदू कुटुंबाच्या जमिनीचे कोर्ट तडजोड हुकूमनाम्याप्रमाणे महसुली अभिलेखात नोंदी घेत नसल्याच्या निषेधार्थ बार्शी न्यायालयातील पद्माकर काटमोरे व रामेश्‍वर घोळवे या दोन वकिलांनी 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणा सुरू केले होते.

वाटणी संदर्भातील त्याबाबतीत लागू असलेला शुल्क आकारून त्याप्रमाणे उपरोक्त कोर्ट तडजोड नोंदी गावकामगार तलाठी यांचे कडे घेण्यासाठी पाठवण्यात येतील व कोणत्याही नोंदी प्रलंबित राहणार नाहीत असे लेखी आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर वकिलांचे सुरू असलेले हे उपोषण थांबवण्यात आले.

याबाबत बार्शी वकील संघाच्या पाठिंब्याने या दोन्ही वकिलांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, आमच्या वकिली व्यवसायामध्ये बर्‍याच पक्षकारांच्या एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीचे वाटप करण्याकरिता दावे दाखल करावे लागतात. वेगवेगळ्या लोकअदालतीमध्ये अशा प्रकारची प्रकरणे निकाली निघतात. यात तडजोड हुकुमनामा हा भारतीय नोंदी कायद्यान्वये नोंदी करणे बंधनकारक नाही. असे अनेक न्यायनिवडे सर्वोच्च व उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांनी न्यायालयाच्या तडजोड हुकूमनाम्याचे नोंदीशिवाय सदर तडजोड हुकूमनाम्याच्या नोंद महसूल अभिलेखात घेवू नये अशा आशयाचे  आदेश वजा पत्र दिले आहे.

त्या पत्रानुसार बार्शी तालुक्यात न्यायालयात होणार हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीबाबतचे वाटप तडजोड हुकूमनाम्या आधारे महसूल अधिनियमात नोंदी घेण्याचे काम तालुक्यातील तलाठी, मंडल अधिकारी यांनी बंद केले आहे. 

हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे वाटप करणे हा त्या व्यक्तीला मिळालेला हक्क आहे. असे असताना नोंदीचे बंधन घालणे, दंड आकारणे, मुद्रांक शुल्क आकारणे, सर्वसामान्यांच्या कायदेशीर हक्कावर बेकायदेशीरपणे गदा आणण्यासारखे आहे. यावर जिल्हाधिकार्‍यांनी 14 ऑगस्ट 2018 रोजी परिपत्रक काढून योग्यते निर्देश दिले असताना बार्शीत नोंदी धरल्या जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे.  त्यामुळे आम्ही नाराज होवून लोकशाही मार्गाचा अवलंब करत लोकहितासाठी 15 ऑगस्ट रोजी बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे या निवेदनात म्हटले होते व त्याला अनुसरून आज उपोषण ही सुरू करण्यात आले. या उपोषण स्थळी वकील संघाचे अध्यक्ष काकासाहेब गुंड, परशुराम करंजकर, सरकारी वकील प्रदीप बोचरे,सर्व सदस्य उपस्थित होते.

आंदोलन सुरू होताच सकाळी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील उपोषणाला भेट देऊन तहसीलदार व उपोषण कर्त्याशी चर्चा केली, हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

काही वेळाने वकील संघाचे सदस्य आमदार दिलीप सोपल हे उपोषण स्थळी दाखल झाले त्यांनी ही हा प्रश्न केवळ वकिलांचा नसून हजारो शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे सामंजस्याची भूमिका घेऊन मार्ग काढावा अन्यथा मीच उपोषणाला बसतो असा इशारा दिला. व त्यानंतर तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण थांबविण्यात आले.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, महसूल, विधी व न्यायमंत्री व संबंधितांना पाठविण्यात आल्या होत्या.

तहसीलदार यांनी असे दिले लिहून

उपरोक्त विषयान्वये कळविणेत येते की, वरिल संदर्भ क्रमांक 1 अन्वये अर्ज इकडील कार्यालयास
प्राप्त झालेला असुन प्रस्तुत अर्जाचे अवलोकन केले असता एकत्र हिंदु कुटुंबातील मिळकतीचे कोर्ट तडजोड हुकुमनाम्या प्रमाण येत असलेल्या नोंदी होत नसले बाबत अर्जात नमुद केलेले आहे. परंतु वरील संदर्भ क्रमांक 2 व 3 नुसार एका हिंदुकुटूबातील मिळकतीचे कोर्ट तडजोडनामा इकडील कार्यालयास प्राप्त झाल्यास महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधिल अनुसूची 1 मधील अनुच्छेद 46 (1) (ब) मधिल तरतुदीनुसार शेतजमीनीच्या वाटणीच्या संबंधातील असेल त्याबाबतीत लागु असलेला शुल्क 100/- रु. इतका असेल अशी तरतुद आहे.

तरी त्याप्रमाण अशा उपरोक्त कोर्ट तडजोड नोंदी संबंधित गावकामगार तलाठी यांचेकडे अभिलखात नोंदी घेणेकामी पाठवणत यतील तसेच कोणत्याही नोंदी प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. तरी आपणांस विनंती करणत येते की, दिनांक 15/08/2019 रोजी तहसिल कार्यालय बार्शी येथे सुरु केलेले आमरण उपाषण सोडावे स्थगीत करावे व प्रशासनास सहकार्य करावे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: