अकलूज मध्ये मोहिते पाटलांची भव्य रॅली

अकलूज- भाजपाचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूजमध्ये खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा काढण्यात आली होती. यात हजारो लोक सहभागी झाले होते. माळशिरस तालुका मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला आहे. येथे कालच राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वर टीका केली होती. यास आज मोहिते पाटील यांनी भव्य पदयात्रा काढून उत्तर दिल्याची चर्चा होती. माळशिरस तालुका या निवडणुकीत भाजपासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल याची जाणीव राष्ट्रवादी ला असल्याने येथे पवारांसह अनेक नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत.

admin: