योग्य निर्णय आमच्या बाजूने येईल, देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

 

आज सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंबंधी याचिकेवर सुनावणी झाली. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाच्या वकिलांनी आज कोर्टात युक्तिवाद केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंबंधी याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

याप्रकरणाची सुनावणी येत्या 01 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणार का, असा प्रश्न संपूर्ण राज्याला पडला आहे. कारण ज्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधीची केस आहे.

 

त्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधीच बेकायदेशीर आहे, त्यामुळे पुढे मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही, असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Team Global News Marathi: