आप’च्या उमेदवार यादीत संदीप पाठकचे नाव, काय आहे सत्यता ?

 

मुंबई | जापंजाब विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आप पार्टीची मोठी चर्चा आहे. यानंतर आता हा पक्ष राज्यसभा निवडणुकीसाठी तयारी करतोय. पाहताच आम आदमी पार्टीमध्ये मराठी अभिनेता संदीप पाठक यांना पंजाबमधून राज्यसभेचं तिकीट दिलं आहे. होय होय तुम्ही बरोबर वाचताय. मुख्य म्हणजे सोशल मीडियावर तसे पोस्टर शेअर होत आहे.

आम आदमी पक्षाने राज्यसभेसाठी त्यांच्या पक्षाचे नेते संदीप पाठक यांच्या नावाची घोषणा केली. पण बऱ्याच ठिकाणी आता संदीप पाठकचा फोटो वापरला जातोय आणि ते फोटो व्हायरल होत आहेत. त्यावर संदीप पाठकने दिलेली प्रतिक्रिया तर त्याहून जास्त चर्चेत आहे. मराठी अभिनेता संदीप पाठक याचा फोटो आम आदमी पार्टीचा उमेदवार म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून स्वतः संदीप पाठक सुद्धा चक्रावला आहे

या संदर्भात मराठी अभिनेता संदीप पथक याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनदेखील लिहिले आहे. यात संदीप पाठक याने लिहिलं आहे कि, “तो मी नव्हेच! आप चे डॉ. संदीप पाठक ह्यांची पंजाबमधून राज्यसभेवर निवड झाली आहे माझी नाही. बऱ्याच ठिकाणी, काही चॅनल वर माझे फोटो वापरत आहेत. ‘आप’ल्याला ह्यात ओढू नका!”, अशा आशयाचं ट्विट संदीप पाठकने केलं आहे.

Team Global News Marathi: