तुम्ही ज्या नर्सरीत शिकता, पवार त्याचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोत यांना टोला

आपण ज्या नर्सरीत शिकता, शरद पवार हे त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवल्याचा टोला राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना लगावला. खोत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली होती या टीकेचा राष्ट्र्वादीने खरपूस समाचार घेतला आहे.

पुढे बोलताना शेख म्हणाले की, सदाभाऊ खोत यांचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये पडला आहे, त्यांनी कोणाच्या बाबतीत बोलावं हे त्यांना समजत नाही, असा टोला सुद्धा लगावला होता. सदाभाऊ खोत यांचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये पडला आहे. त्यांनी कोणाच्या बाबतीत बोलावं हे त्यांना समजत नाही. सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत, ते काहीही बोलू शकतात असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.

सदाभाऊ खोत हे कोणाच्या बाबतीत बोलतात, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काळात क्रिकेटचे ट्वेंटी-ट्वेंटी सामने सुरु झाले. पवार साहेबांच्या कार्यकाळात वर्ल्ड कप सुरु झालं, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले नसले तरी गाव पातळीवर खेळले आहेत, असंही मेहबूब शेख म्हणाले.

Team Global News Marathi: