तुम्ही पर्यावरणमंत्री असून काय केलं?’, आदित्य ठाकरेंना नागरीकांनी घेरले !

 

पश्चिम महाराष्ट्र कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे थेतील जंजीरवान संपूर्णपणे विस्कळीत झाले होते. या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूनमध्ये दाखल झाले होते. तसेच यदौर्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत सुद्धा त्यांचयसोबत चिपळूणमध्ये दाखल झाले होते.

यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी तुम्ही पर्यावरणमंत्री आहात, कोकणात काय चाललंय हे पाहिलं आहे का, अशी विचारणा आपले सर्वस्व गमावलेल्या संतप्त चिपळूणकरांनी केली आहे. तसेच नागरिकांनी त्यांना घेराव घातला होता.

आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर आहेत. तेव्हा तिथल्या नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांनी आदित्य ठाकरेंना थेट प्रश्न केला आहे. तुम्ही पर्यावरण मंत्री आहात, कोकणात काय चालले आहे, तेथील परिस्थिती काय आहे? हे पाहायला तुम्ही येत नाही. तुम्ही कधीतरी येता, महिन्यातून एक फेरी तरी होते का तुमची? इथे आमच्या भागातील पूल वाहून गेलेत, अशी कैफियत मांडली. यावेळी पूरग्रस्तांना पंचनामे झाल्यावर भरीव आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

Team Global News Marathi: