‘तुम्ही गैरसमज पसरवू नका’; अजित पवारांनी फडणवीसांना चांगलेच सुनावले

 

मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. आता फडणवीसांच्या या टीकेचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते आज नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीवरून होत असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

तुम्ही गैरसमज पसरवू नका म्हणत त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तिथे उपस्थित आहेत. तसेच ते पुर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यासाठी आम्ही जाऊन पुर्ण एक दिवस यंत्रणा आमच्या मागे राबवणार आणि त्यामुळे बाकीची कामं बुडणार’, असं देवेंद्र फडणवीसांना सुनावलं आहे. जिथे पाहणी केली पाहिजे तिथे केली जाते, असं म्हणत अजित पवारांनी तुम्ही गैरसमज पसरवू नका, असं देवेंद्र फडणवीसांना खडसावलं आहे.

अजित पवारांच्या या टीकेमुळे पवार विरूद्ध फडणवीस असा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. मंत्रालयातून व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व गोष्टींंवर लक्ष आहे, असं देखील पवारांनी स्पष्ट केलं आहे. नगर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ६१ गावात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यातील संगमनेर व पारनेर तालूका हा पुणे आणि नाशिक जिल्ह्याला लागून असल्याने या दोन जिल्ह्याला कोरोनाचा पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो.

Team Global News Marathi: