“तुम्ही राज्याचे आहात की भाजपचे, ते तरी सांगुन टाका एकदा”

पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुरग्रस्तांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी दरड कोसळून अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिह कोश्यारी दुर्घटनाग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. आज सकाळी या दौऱ्यासाठी निघाले आहेत.

आता राज्यपालही चिपळूणला जात आहेत. त्यासोबतच दरड कोसळून गिळंकृत झालेल्या तळीये गावाचीही पाहणी कोश्यारी करणार आहेत. मात्र त्यांच्यासोबत या दौऱ्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार असल्यामुळे हा सरकारी दौरा आहे की पक्षाचा अशी विचारणा आता होऊ लागली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

राज्यपाल महोदय आज आशिष शेलार यांना तळीये गावात सोबत घेऊन का गेले असावेत?. राज्यपाल या महत्त्वाच्या पदावर असताना सुद्धा भाजपचे आमदार सोबत घेऊन शासकीय दौरा करणे हे कितपत योग्य?, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही राज्याचे आहात की भाजपचे, ते तरी सांगुन टाका एकदा, असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.

महामहिम राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत की भाजपाचे याबाबत महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम आहे. गरज नसताना आशिष शेलार यांना सोबत नेणे हे राज्यपाल शिष्टाचारात बसणारे नाही. राज्यपालांनी घटनेचा अभ्यास करून स्वतः अधिकार समजून घ्यावेत, असा सल्ला देखील मिटकरी यांनी राज्यपालांना दिला आहे.

Team Global News Marathi: