तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, हे दाखवून दिलं, भाजपचं प्रतिउत्तर

 

विजयादशमीच्या शुभेच्छा देताना शिवसेनेनं आजच्या सामना अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. ‘शिवसेनेमुळे राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोड्याप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे. असं ही वाताहत पाहून आम्हाला या मंडळींची कींव करावीशी वाटते अशी टीका शिवसेनेनं केली. सेनेच्या टीकेला आता भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, हे वारंवार दाखवून दिलं’, असं म्हणत भाजपनं शिवसेनेची तुलना शेळीशी केली आहे.

दसरा आणि शिवसेनेचा मेळावा या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून पक्षाने मांडलेल्या भूमिकेची चर्चा होतं आहे. शिवसेनेनं भाजपवर टीका केली. या टीकेचा भाजपनंही समाचार घेतला आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सामना अग्रलेखातील काही ट्वीट केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केलेल्या महाविकास आघाडीवरून त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

‘स्वत:ला वाघ म्हणवणारे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कळपात घुसून कधी शेळी बनले त्यांनाही कळालं नाही. बरं झालं, महाविकास आघाडीत सामील झाल्यानं हिंदुत्वाचा बुरखा फाटला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही हे वारंवार दाखवून दिलं’, अशी टीका केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर केली आहे.

 

Team Global News Marathi: