तुम्ही सगळे महाराज एकत्र या; मग होऊन जाऊद्या आमने-सामने” आमदार संजय गायकवाड यांचे आव्हान !

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर भाष्य करत चाहते आव्हान दिले होते. मात्र आता आमदार गायकवाड यांची एक क्लिप चांगलीच वायरल होताना दिसत आहे.कोरोनासंदर्भात संजय गायकवाड यांची स्थानिक वृत्तपत्रात बातमी छापून आली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायात गायकवाड विरोधात नाराजी पसरली आहे. मांसाहार केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढेल, कोरोनातून तुम्हाला देव वाचवायला येणार नाही असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले होते.

संजय गायकवाड यांच्या विधानानंतर अनेक वारकरी संप्रदायातील लोकांनी फोन करून त्यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी संजय गायकवाड यांनी कथित ऑडिओ क्लीपमध्ये वारकऱ्यांना थेट इशारा दिल्याचं त्या ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला मिळतं आहे. या ऑडिओ क्लीपमधील आवाज संजय गायकवाड यांचाच असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. या क्लीपमुळे नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहे,

संजय गायकवाड म्हणतात की, तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे. पण मी रोज २०-२५ जणांच्या अस्थी जाळू लागलो, तुमच्या लोकांची श्रद्धा आहे हे मला माहित्येय, पण मी जे बोललो ते वास्तव आहे. मी पण नास्तिक नाही परंतु काळाची गरज आहे ते बोललो. तुम्ही सगळ्या महाराजांनी वेगवेगळे फोन करू नका. माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही सगळे एकत्र या मग बघू. आमचं लॉकडाऊन ३० मे ला उठतंय, ३१ मे ला तुम्ही सिंदखेडराजाला या मग आमनेसामने बघू काय होतं? असंही संजय गायकवाड बोलत असल्याचं ऐकायला मिळत आहे.

कोरोनाकाळात मंदिरंही बंद आहेत. देव पण लॉक करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. स्वत:ची काळजी स्वत:लाच घ्यायची आहे. त्यामुळे उपास तापास बंद करा, रोज ४ अंडे खा. एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटिनयुक्त भरपूर खा असा सल्ला त्यांनी लोकांना दिला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता.

Team Global News Marathi: