उत्तर प्रदेशात जागतिक स्तरावरील फिल्मसिटी उभारणार, योगी आदित्यनाथ यांची मुंबईत घोषणा
मुंबई: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. राज्यात फिल्मसिटी मार्गी लागावी तसेच गुंतवणुकीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी विविध उद्योजक आणि औद्योगिक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. तसेच सिनेअभिनेता अक्षय कुमार यांची सुद्धा भेट घेतली. तसेच आज मुंबई येथे पत्रकार परिषदे आयोजित करून त्यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले ‘उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचे काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिली आहे.
We're not taking anything anywhere. Mumbai Film City will work in Mumbai itself, new Film City in UP is being developed in a new environment according to new requirements: UP CM on being asked about Maharashtra CM saying that he won't allow his state's business to be taken away https://t.co/kSluuRkL4G pic.twitter.com/5OiTdQaTve
— ANI UP (@ANINewsUP) December 2, 2020
आशियातील सर्वात मोठं विमानतळ असलेल्या जेवर विमानतळाजवळील १ हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर ही फिल्म सिटी उभी करणार आहोत. या ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधनं असतील. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही यासाठी रस दाखवला आहे. त्यासाठी त्यांचं अभिनंदन असे पत्रकार परिषदेत बोलून दाखविले.