‘येणारा काळ अपक्षांचा, येत्या काळात ‘प्रहार’ संघटनेचा मुख्यमंत्री असणार’ – बच्चू कडू

 

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे.तर राज्यसभेवेळी झालेल्या चुका सुधारत महाविकास आघाडी देखील सतर्क आहे. या मतदान प्रक्रियेत सर्वाधिक भाव आला आहे तो अपक्ष आमदारांना. अपक्ष आमदारांचं वाढतं वजन पाहता आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

बच्चू कडू यांनी म्हटलं की, येणारा काळ हा अपक्ष आमदारांचा असणार आहे. हम बोलेंगे वैसे ही सरकार चलेगा, असं ते म्हणाले. अपक्षांचा झटका काय असतो आणि परिणाम कसे असतील ते विधान परिषद निवडणुकीत दिसणार आहे, असंही बच्चू कडू म्हणालेत. आता बच्चू कडू यांच्या या विधानामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

बच्चू कडू म्हणाले, “येणारा काळ हा छोट्या पक्षाच्या आमदारांचा आणि अपक्ष आमदारांचा असणार आहे. कारण निवडणुकीत दिवसेंदिवस त्यांचं वजन वाढत आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल. महाविकास आघाडीच्या बाजूला राहून दुसऱ्या पक्षाला फटका बसेल. पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे अपक्ष ठरवणार. येत्या काळात ‘प्रहार’ संघटनेचा मुख्यमंत्री असेल, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: