याकूब मेमन कबर प्रकरणी मुख्यमंत्री शिदेंनी दिला इशारा

 

1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो ९३ च्या बॉम्बस्फोटचा प्रमुख आरोपी आहे. त्या फोटोमध्ये याकूब मेमनच्या कबरीला सजवण्यात आलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. याच मुद्यावरून भाजप पक्षाचे नेत्यांनी शिवसेना पक्षाला टार्गेट केलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. यावरून सध्या महाराष्ट्रात नवीन वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. यानंतर यावर आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. याप्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच याला जो कोणी जबाबदार असेल, त्याची दखल घेत दोषींवरह कडक कारवाई केली जाईल. असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

तर मुनगंटीवार म्हणाले की, दहशतवादी विचारांना कोणी संरक्षण देत असेल तर असे लोक समोर आले आहेत, देवेंद्र फडणवीसांनी या संबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत मी या निर्णयाचं स्वगत करतो असे मुनगंटीवार म्हणणाले. या प्रकरणी मुंबई पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या नेतृत्वात चौकशी होणार आहे. एलटी मार्ग पोलिस ठाण्याचे आधिकारी देखील तपास करणार आहेत. वक्फ बोर्ड, धर्मादाय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांकडून याबाबत माहिती घेण्यात येत आहे.

Team Global News Marathi: