:”.यासंदर्भात त्यांनी भाजपतील माताश्री, पिताश्रींना प्रश्न विचारावा;” राऊतांचा मनसेला टोला

 

१० जून रोजी राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच या निवडणुकीत कोणताही दगाफटका बसू नये यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना अन्यत्र हलवलं आहे. शिवसेनेनंही आपल्या आमदारांना एका हॉटेलवर ठेवलं आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ही एक व्यवस्था म्हणून असं केलं आहे. मतदानाच्या वेळी एकत्र जायचं असतं.

महाराष्ट्र मोठा आहे, दऱ्या खोऱ्यांचा आहे, आमदार लांब राहतात. त्यांना काही सूचना द्यायच्या असतात. विधान परिषद आणि राज्यसभेच्या मतदानाची प्रक्रिया ही तांत्रिक असते. वेगळ्या प्रकारचं मतदान असतं, आमदारांना मार्गदर्शन करायचं असतं, म्हणून त्यांना एकत्र ठेवलं आहे,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

“अशाप्रकारे भाजपनं, काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं आपल्या आमदारांना एकत्र ठेवलंय. त्याबद्दल थोबाडावर प्रश्नचिन्ह निर्माण करावं असं काय आहे,” असा सवालही त्यांनी केला. तुम्ही केलं तर चालतं, तुमचं गेट टुगेटर आणि आम्ही बाजूला घेऊन गेलो, हे सर्व मुर्ख लोक आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेच्या दोन्ही जागा आणि महाविकास आघाडीच्या चारही जागा निवडून येतील. १० तारखेला संध्याकाळी ८ वाजता निकाल स्पष्ट झाले असतील असंही ते म्हणाले.

तसेच मनसेला टोला लागवतना राऊत म्हणाले की, “मनसेनं त्यासंदर्भात त्यांचे भाजपमधील माताश्री, पिताश्रींना प्रश्न विचारावा. केंद्रात त्यांचं सरकार आहे. राज्याकडून हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे,” असं म्हणत मनसेला टोला लगावला. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतरण कधी होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी मनसेवर निशाणा साधला.

Team Global News Marathi: