चिंताजनक: लहान मुलांसाठी कोरोनाची दुसरी लाट अंत्यत धोकादायक, या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका!
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- कोरोनाची पहिली लाट २०२० ला आली, जेव्हा कोरोनाव्हायरस साथीचा रोग प्रसार झाला तेव्हा असे म्हटले जात होते की कोरोना मुलांसाठी फार धोकादायक नाही. तसेच त्यावेळी जास्त मुलांना मध्ये संसर्ग झालेला नव्हता. परंतु कोरोनाच्या या दुसर्या लाटेत कोरोनाचा नवी विषाणू B.1.1.7 आणि B.1.617 चे नवीन प्रकार मुलांसाठी अधिक धोकादायक आहे, हे पुढे आले आहे आणि या दुसर्या लाटेमध्ये मोठ्या संख्येने मुलांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून येते. यामुळे मुलांचे पालक चिंतेत आहेत. दरम्यान, मुलांना जर खालील लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.
लहान मुलांमधील या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका-
नवी मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष राव सांगतात, “कोरोनाची दुसरी लाटेत पूर्णपणे उलट ट्रेंड (Reverse trend) दिसून येत आहे. गेल्यावर्षी, लहान मुलांना कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत. त्याचवेळी, यावर्षी कोरोनाच्या दुसर्या लाटेत, प्रथम लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत आणि संसर्ग लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत पसरत आहे. म्हणूनच जर आपल्याला ही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
– ताप
– सर्दी पडसे
– कोरडा खोकला
– लूज मोशन (जुलाब)
– उल्टी येणे
– भूक न लागणे
– जेवण योग्य प्रमाणात न घेणे
– थकवा जाणवणे
– शरीरावर पुरळ उठणे
– श्वास घेताना अडचण किंवा त्रास होणे
सुपरप्रेडर असू शकतो मुलांन मध्ये-
डॉ. राव सांगतात लहान मुलाला कोविड-19 इंफेक्शन अर्थात संसर्गाची लक्षणे दिसल्यास दुसर्या दिवशी लगेचच आरटी-पीसीआर चाचणी करुन घ्या. चाचणी करुन घेण्यात उशीर करु नका. उपचार लवकर सुरु करणे महत्वाचे आहे. हे लक्षात ठेवा की मुले सुपरप्रेडर होऊ शकतात, म्हणजेच ते इतर मुलांना आणि प्रौढांना वेगाने संक्रमित करु शकतात. त्यामुळे पालकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार बर्याच मुलांमध्ये कोरोना विषाणूमुळे एक गंभीर आणि धोकादायक गुंतागुंत पहायला मिळत आहे, ज्याला मल्टिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रेन (MISC) म्हणतात. हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, मेंदू, त्वचा, पचनाशी संलग्न अवयव किंवा डोळ्यांमध्ये जळजळ होण्याची समस्या असू शकते.
पालकांनी या गोष्टी ठेवा लक्षात
मुलास कॅविड संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यास आणि डॉक्टरांनी मुलास घरात अलिप्त राहण्याचा सल्ला दिला तर मुलाला घरात इतर लोकांपासून दूर ठेवा. शक्य असल्यास कुटुंबातील इतर सदस्यांकडून मुलासाठी स्वतंत्र बेडरुम आणि बाथरुमची व्यवस्था करा. संक्रमित मुलाची काळजी घेताना, पालकांनी डबल मास्क घालावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.