चिंताजनक: राज्यात आज कोरोनाचे ५ हजार ३६८ नवे कोरोना रुग्ण

चिंताजनक: राज्यात आज कोरोनाचे ५ हजार ३६८ नवे कोरोना रुग्ण

मुंबई :- एकीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांचं आयोजन केलं जात आहे, तर दुसरीकडे कोरोना (Corona) पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय झाली झाली आहे.

राज्यात आज कोरोनाचे ५ हजार ३६८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काल ही संख्या ३ हजार ९०० इतकी होती. त्यात मुंबईत सर्वाधिक ३ हजार ९२८, त्या पाठोपाठ ठाण्यात ८६४ आणि पुण्यात ५२० जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

 

मुंबईत आज ३ हजार ९२८ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या बुधवारी २ हजार ५१० इतकी होती. त्यामुळे मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट आता ८.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत आज ३७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या ११ हजार ३६० सक्रीय रुग्ण असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे कोरोनाच्या मोठ्या रुग्णवाढीसोबतच राज्यात आज तब्बल १९८ ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या मुंबईतल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या १९०वर गेली आहे. तर ठाण्यात ४ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत ४५० रुग्णांची नोंद झाली आहे तर १२५ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. एकिकडे कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ तर दुसरीकडे ओमिक्रॉन रुग्णांची झपाट्याने वाढ त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: