चिंताजनक: राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले; 30 जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज पुन्हा नव्याने ५ हजारांच्या वर रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज रोजी एकूण ८३,२२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ४,०८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १६,५८,८७९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६९ % एवढे झाले आहे.

आज राज्यात ५,४३९ नवीन रुग्णांचे निदान

आज राज्यात ५,४३९ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. राज्यात आज ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०३,६६,५७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,८९,८०० (१७.२७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,३६,६४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण ८३,२२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: