राज्यात आज 8807 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2772 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2008623 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 59358 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70% झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे दोन नवे विषाणू सापडले आहेत. केरळ आणि तेलंगणामध्येही त्याच स्वरूपाचे विषाणू आढळले आहेत. केंद्र सरकारकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. मात्र या राज्यांमध्ये वाढणाऱया रुग्णसंख्येला हे नवे विषाणू जबाबदार आहेत असे सध्यातरी सांगता येणार नाही असे केंद्र सरकारने म्हटले आहे. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्यात आज 8807 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2772 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2008623 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 59358 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 24, 2021
महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगणामध्ये कोविडचे ‘एन 440 के’ आणि ‘ई 484 के’ स्वरूपाचे नवे विषाणू आढळले आहेत. देशातील 187 नागरिकांना ब्रिटिश कोरोनाची लागण, तर सहा रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेतील कोविडचे विषाणू आढळले आहेत. एका रुग्णामध्ये ब्राझील कोविडचे विषाणू आढळले आहेत.