चिंताजनक ! पुण्यात दिवसभरात 1504 नवे कोरोना रुग्ण; सात मृत्यू

ग्लोबल न्यूज : पुण्यात आज, गुरुवारी 8553 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 1504 नवे रुग्ण सापडले. तर 675 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आज एका दिवसात कोरोनाबाधितांनी 1500 चा टप्पा ओलांडला आहे.

आज कोरोनाबाधित 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 357 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असून 739 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2 लाख 13 हजार 25 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 8541 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4917 रुग्णांचा मृत्यू झाला.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करावे. तीव्र किंवा सौम्य लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे असे कळकळीचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: