चिंताजनक ! पुण्यात तब्बल 1 हजार 104 नव्या रुग्णांची नोंद

ग्लोबल न्यूज: गेल्या 24 तासात फक्त पुण्यात तब्बल 1 हजार 104 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाबाधितांचा एवढा मोठा आकडा वाढल्याने पॉझिटिव्हीटी रेट हा थेट जवळपास 18 टक्क्यांवर गेल्याचा अंदाज आहे.

 

कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला तरी मृत्यूच्या आकड्यांमध्ये सध्यातरी वाढ झालेली नाही. पुण्यात आज दिवसभरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. तर 151 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: