महिला दिनानिमित्त राज ठाकरेंनी दिला महिलांना खास सल्ला

मुंबई : ८ मार्च जागतिक महिला दिन आज सर्व स्थरातून स्त्री शक्तीचा आदर केला जात असून सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच नेत्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मूळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, ‘बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल, तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील.’

त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. असो.,” असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

Team Global News Marathi: