महिला छेडछाड तपास प्रकरणी चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण !

नाशिक | सध्या महाराष्ट्र महिलांवर अत्याचार्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून याच मुद्द्यावरून विरोधकांनी आता सत्ताधारी पक्षाला लक्ष केले आहे. त्यातच आता महिला छेडछाडीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार महिलांची छेडछाड केल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. विशेष म्हणजे ही तक्रार पोलिस हवालदार सागर जगन्नाथ जाधव यांनी दिली होती. तक्रारीचा तपास करण्यासाठी पोलिस संत कबीरनगर झोपडपट्टीत भागात गेले. याप्रकरणी पोलिसांनी अजय घुले या संशयिताला पूर्वीच अटक केली आहे. त्याच्या सांगण्यावरून संशयित महेश कटारिया याच्यावरही सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतच्या तपासाची विचारपूस पोलिसांनी कटारिया याच्याकडे केली. तेव्हा त्याने जोरजोरात आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना बोलावून घेतले. त्याची आई, बहीण आणि मित्रांना चक्क रॉकेलची कॅन घेऊन बोलावले. तेव्हा एक महिला यावेळी डिझेलची कॅन घेऊन आली. परिस्थिती हाताबाहेर जात होती. त्यामुळे पोलिसांनी पुढे होत डिझेलची कॅन हातात घ्याचा प्रयत्न केला शिवाय त्यांना धमकीही दिली. त्यामुळे पोलिसांनी गंगापूर पोलिस ठाण्यात महेश कटारियाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Team Global News Marathi: