शिवसेनेच्या नेत्यांबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री घेणार बैठक

 

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यातच त्यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेआणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये सुमारे अर्धा तास हा संवाद झाला. यानंतर ममता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहे. त्यांच्या या राजकीय दौऱ्याबाबत नव्या विरोधी आघाडीची तयारी त्या करत आहेत का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्याकडे टीएमसीचा विस्तार म्हणून पाहिले जात असून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीतून महाराष्ट्रात भाजपविरोधात नव्या युतीबाबत हवा तेज होत आहे. आजकाल तृणमूल काँग्रेसने काँग्रेसपासून चार हात अंतर दूर ठेवले असले तरी महाराष्ट्रात राष्ट्रवादी-शिवसेनेशिवाय काँग्रेसही सत्ताधारी आघाडीचा एक भाग आहे.

ममता यांचा दौरा आणि त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत घेतलेल्या भेटीबद्दल, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणतात की, काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय विरोधी पक्षांची कोणतीही आघाडी स्थापन होऊ शकत नाही. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय विरोधकांची कोणतीही आघाडी स्थापन होऊ शकत नाही, असे शदर पवार यांचेही स्पष्ट मत आहे.

Team Global News Marathi: