महाविकास आघाडीसोबत १९० आमदार! हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपाला आव्हान

बहुमत नसल्यानेच विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यास महाविकास आघाडी टाळाटाळ करत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. आता चंद्रकांत पाटील यांच्या या आरोपांना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आव्हान दिले आहे.

मुश्रीफ म्हणाले, ‘अधिवेशन काळात अनेक आमदार करोना संसर्गाने बाधित होते. तीस ते पस्तीस आमदार अधिवेशनाला उपस्थित नव्हते. त्यामुळेच अध्यक्षपदाची निवडणूक घेतली नाही. ही निवडणूक घेण्याची आमची कधीही तयारी आहे. आमच्याकडे सध्या १७० आमदार आहेत आणि निवडणूक झाली तर आमच्या उमेदवाराला १९० मते मिळतील. असे मुश्रीफ यांनी बोलून दाखिवले होते.

तसेच परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बवर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, माफीचा साक्षीदार करण्यासाठीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप केले आहेत, असा दावा मुश्रीफ यांनी केला. महाविकास आघाडी सरकार पाडायला भाजपचे नेते टपून बसले आहेत असा दावा त्यांनी केला होता.

Team Global News Marathi: