कोरोनाच्या वाढत्या प्रभावानंतरही शाळा-कॉलेज सुरु राहणार? आदित्य ठाकरे म्हणतायत की,

 

मुंबई | काही महिन्यांपूर्वी कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉननं देशापाठोपाठ महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रातही या व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून खबरदारीचे पाऊल उचलली जात आहेत. अशातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राज्यातल्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी शाळा- कॉलेजच्या परिस्थितीवर पुन्हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.

शाळा कॉलेजची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागणार असल्याचं म्हणत काही लहान मुलांनी शाळा पाहिली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा आठवडा झाल्यावर पुढच्या आठवड्यात निर्णय घेऊ, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. सध्या सणासुदीच्या दिवसात गर्दी वाढली आहे. ख्रिसमस, न्यू इयर असताना लोक काळजी जास्त घेत नाही असंही ते म्हणालेत.

मास्क लावणं गरजेचं आहे. लसीकरण झाल्यावरही मास्क घालावे लागणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी जनतेला सांगितलं आहे. प्रत्येकाच्या मनात कोविड होऊन गेला, लस घेतली त्यामुळे होणार नाही असा गैरसमज आहे, असं म्हणत दोन लस आणि मास्क घालवाच लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं. विधानभवनातील कोरोना पॉझिटिव्हवर प्रतिक्रिया वातावरण भीतीच आहे.

 

 

Team Global News Marathi: