फक्त लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, उद्धव ठाकरे यांचे पूरग्रस्तांना अश्वासन !

 

काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने हाहा:कार माजवला असून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील विशेष करुन महाड आणि चिपळूणला पवसाचा मोठा फटका बसला आहे. चिपळूणमध्ये तर पूरामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले, अनेकांचे संसार उद्धवस्त झाले.

दरम्यान, आज मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पुरामुळे ज्यांची शेती, घरदार आणि दुकानाचे नुकसान झाले, त्यांना तातडीने मदत केली जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळस त्यांच्यासोबत आमदार भास्करराव जाधव, मंत्री अनिल परब आणि अन्य नेते उपस्थित होते.

चिपळूनमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन मदतीचे आश्वासन दिले. आपण हवामान बदल हा शब्द ऐकून होतो, आता त्याचा फटका बसू लागला आहे. काल मी तळीये गावात गेलो होतो. तिथे वर्षानुवर्षे असलेल्या गावांवर दरडी कोसळत आहेत.

दरडीखाली लोक दबून जात आहे. अचानक कुठेतरी ढगफुटी होते, पूर येतो, जीवितहानी होते. पिकांचही नुकसान होतं. हे आता दरवर्षी होत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, ‘तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेतील व्यावसायिक व दुकानदारांना धीर दिला.

Team Global News Marathi: