महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला फडणवीस जाणार का? अनिल देशमुख

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला फडणवीस जाणार का? अनिल देशमुख

ग्लोबल न्यूज: सुशांत सिहं राजपूत आत्महत्या प्रकरणाचा संदर्भातील अहवाल एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयकडे सुपूर्त केला आहे. या अहवालात सुशांतची हत्या झाल्याचे नाकारण्यात आले आहे. आता हाच मुद्दा पकडत आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे.

सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केलं. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी. अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, बदनामी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असंही त्यांनी बोलून दाखविले. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आनंद वार्ता : आयुष-64 औषध खाल्ल्याने कोरोनापासून राहता येईल दूर..!

पुढे बोलताना ते म्हणाले की “महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?,” अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली आहे.एम्सचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. कूपर आणि एम्सचा रिपोर्ट पाहिला तर त्यात कुठेही व्हिसेरामध्ये विषाचा अंश सापडला नाही. या संपूर्ण केसची चौकशी सीबीआयच्या माध्यमातू सुरु आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट येईल तेव्हा त्यात काय असेल याची सर्वजण वाट पाहत आहेत. लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी आमची विनंती आहे. यामुळे सुशांतची हत्या होती की आत्महत्या हेदेखील स्पष्ट होईल असे यावेळी देशमुख म्हणाले.

शरद पवार यांनी घेतले सिरम इन्स्टिट्यूटमधील ‘हे’ इंजेक्शन

ग्लोबल न्युज नेटवर्क: