एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का ? दिपाली सय्यद यांचे खळबळजनक ट्विट

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का ? दिपाली सय्यद यांचे खळबळजनक ट्विट

मुंबई – शिवसेनेत बंडखोरी करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देणारे एकनाथ शिंदे 2 दिवसांत एकत्र येणार असल्याचे शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. सय्यद यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी सुरतमध्ये जाऊन पक्षाविरोधात बंड पुकारला. सेनेच्या 40 आमदारांनी शिंदे यांच्या बंडाचे समर्थन केले.

बंडखोरांची हकालपट्टी करत पक्षबांधणीवर भर – राज्यातील महाविकास आघाडी विशेषतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षात अंतर्गत दुफळी यानंतर वाढू लागली. अनेकांनी ठाकरे यांना रामराम करत शिंदे गटात सामील झाले. पक्षातील गळती वाढू लागल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक होत, बंडखोरांची हकालपट्टी करत पक्षबांधणीवर भर दिला आहे.

 

अशातच दिपाली सय्यद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी एकत्र यावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मदत केल्याचे खळबळजनक ट्विट केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दीपाली सय्यद यांचे ट्विट – ‘येत्या 2 दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थीकरिता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद ! चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल’. असं ट्विट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी शनिवारी रात्री उशिरा केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार का हे पहाव लागणार आहे.

आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे – लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे. शिवसेनेच्या 50 आमदारांनी मातोश्रीवर दिसावे. आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे. त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील’, असे आणखी एक सूचक ट्विट दिपाली सय्यद केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: