बायको आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर, ३० वर्षीय नवऱ्याला अटक

 

मुंबई | आपल्याच बायकोचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट करुन तो व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवणाऱ्या नवऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बायको माहेरुन सासरी येण्यास नकार देत असल्याने नवऱ्याने हे कृत्य केले आहे. मुंबईजवळच्या भिवंडी भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे एकचं खळबळ उडाली होती.

समोर आलेली माहिती अशी की, ३० वर्षीय तरुणाने पत्नी आंघोळ करताना तिचे व्हिडीओ शूटिंग केले होते. ही क्लीप त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस म्हणून ठेवली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर बायकोने मुंबईतील मालाडमधील कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याशिवाय, हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरार गावातील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय महिलेने २०१५ मध्ये भिवंडीतील एका तरुणाशी लग्न केले होते. त्यांना जुळी मुलंही आहेत. महिलेच्या लग्नात तिच्या वडिलांनी जवळपास १२ लाख रुपये खर्च केले होते आणि ५ लाखांहून अधिक किमतीचे दागिनेही दिले होते, तरीही तिच्या सासरची मंडळी तिला हुंड्यासाठी त्रास देत होते आणि फ्लॅटची मागणी करत असल्याचा आरोप आहे. सततच्या छळाला कंटाळून तिने दोन वेळा घर सोडले. अखेर कुरार येथे राहणाऱ्या आई-वडिलांकडे ती आली होती.

Team Global News Marathi: