फडणवीसांची प्रकरण दडपण्याप्रकरणी ED’ने चौकशी का करु नये? – सचिन सावंत

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. २०१६ मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भाजपाला सोडचिट्टी देऊन एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर ईडीने भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली. पुढे ईडीने तपास सुरू ठेवला. ईडीने खडसे यांचे जावई चौधरी यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत चौधरी यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना आज सकाळी अटक केली आहे.

याच विषयाला अनुसरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आता उलट दावा करत फडवीसांवर टीका केली आहे. सावंत यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “एकनाथ खडसे यांना ACB व झोटींग आयोग चौकशीनंतर फडणवीस सरकारने क्लीन चिट दिली. पण खडसेंनी पक्ष बदलला आणि त्यांची मोदी सरकारने ED चौकशी लावली व त्यांच्या जावयाला अटक केली. वाझेची नियुक्ती कोणी केली याची चौकशी सीबीआय’ला हवी, मग फडणवीस यांची प्रकरण दडपण्यासाठी इडीने चौकशी का करु नये?

एकनाथ खडसे यांना ACB व झोटींग आयोग चौकशीनंतर फडणवीस सरकारने क्लीन चिट दिली. पण खडसेंनी पक्ष बदलला आणि त्यांची मोदी सरकारने ED चौकशी लावली व त्यांच्या जावयाला अटक केली

Team Global News Marathi: