कोरोनाच्या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये का ठेवले जाते इतक्या दिवसांचे अंतर?

नई दिल्ली: कोरोनाच्या (Corona) लसीच्या (vaccine) दोन डोसमधील (two doses) अंतर (gap) हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा (discussion) विषय आहे. अनेक लोकांच्या मनात प्रश्न (question) आहे की एका डोसनंतर दुसऱ्या डोसमधील अंतर सरकार (government) का वाढवत (increase) आहे. गेल्या जानेवारीपासून हे अंतर सातत्याने वाढवले जात आहे. कोव्हिशील्डच्या (Covishield) दोन लसींच्या मधले अंतर दोनवेळा वाढवण्यात आले आहे. आधी हे अंतर 4 ते 6 आठवडे होते, नंतर यात बदल (change) करून सांगण्यात आले की 12 ते 16 आठवड्यानंतर दुसरा डोस घेतला जावा.

कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतरात बदल नाही

मात्र भारत बायोटेकने विकसित केलेल्या स्वदेशी कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोसमधील अंतर मात्र वाढवण्यात आलेले नाही. कोव्हिशील्डच्या दोन मात्रांमधील अंतर वाढवण्याबद्दल भारतीय चिकित्सा आणि अनुसंधान परिषदेने स्पष्टीकरण दिले आहे. इथले प्रमुख डॉक्टर बलराम भार्गव सांगतात की हा निर्णय कोव्हिशील्डच्या पहिल्या डोसचा प्रभाव पाहून घेतला गेला आहे.

प्रतिरोधक क्षमतेवर अवलंबून आहे अंतर

डॉ. भार्गव यांचे म्हणणे आहे की कोव्हिशील्डच्या पहिल्या डोसनंतर शरीराची प्रतिरोधक क्षमता बरीच वाढते आणि ही अँटीबॉडी साधारण 12 आठवडे राहते. हे लक्षात घेऊन दुसऱ्या डोसपर्यंतची वेळ वाढवण्यात आली आहे. मात्र कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर विकसित होणाऱ्या प्रतिरोधक क्षमतेबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. आयसीएमआरच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की कोरोनारोधक लसी या 15 डिसेंबरनंतर येऊ लागल्या. याबद्दल नव्या नव्या गोष्टी अजूनही समोर येत आहेत.

फोर्टिस रुग्णालयाच्या डॉक्टर. के. एस. सतीश यांचे म्हणणे आहे की दोन डोसमधील अंतर किती असावे याचे प्रत्येक लसीचे स्वतःचे एक आदर्श अंतर असते. कोव्हिशील्डच्या लसीचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 12 आठवड्यानंतरही घेता येतो तर कोव्हॅक्सिनबद्दल असे काही बंधन नाही. याचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनीही घेता येतो. त्यांचे म्हणणे आहे की लसींच्या निर्मात्यांनी दोन डोसच्या मध्ये जे अंतर निश्चित केले आहे त्याचे पालन सर्वांनी करावे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: