महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार? पवार,पाटील,टोपे की मुंडे?

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही वेळापूर्वी राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्राचा गृहमंत्री कोण असेल अशी चर्चा सध्या माध्यमात सुरू आहे.

ना.अजित पवार उपमुख्यमंत्री

यामध्ये प्रामुख्याने चार नावांची चर्चा होताना दिसून येते त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कार्य केलेले आरोग्य मंत्री राजेश टोपे या राष्ट्रवादीच्या चार वजनदार मंत्र्यांपैकी एखाद्या मंत्र्याकडे गृहमंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार काही दिवसासाठी दिला जाईल. आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करून राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या खात्यात खाते पालट व मंत्रिमंडळात देखील फेरबदल होतील अशी विश्वसनीय माहिती राजकीय कट्टाला मिळाली आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे गृहखाते उपमुख्यमंत्री अजित पवार की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे दिले जाणार

की कोरोना काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतीमा उंचावण्यात ज्यांचा मोठा वाटा आहे अशा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे हा कार्यभार दिला जाणार की

विरोधी पक्षनेते असताना राष्ट्रवादी काँग्रेसची कमान एक हाती सांभाळणारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे गृहखातं जाणार याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: