४खासदार निवडून येणारे पवार लोकनेते, तर ३०३ खासदार निवडून येणारे मोदी कोण ? – गोपीचंद पडळकर
ग्लोबल न्यूज: ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी उपस्थित करत राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता, असे म्हणत त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा प्रचारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात आमदार पडळकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदर निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, तुम्ही पंतप्रधान मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली तर इतका त्रागा का करता, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे.