कोण आहेत शिवसेनेचे उमेदवार कोल्हापूर चे संजय पवार ; वाचा सविस्तर

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण सुरू असताना शिवसेनेने (Shivsena) आपला उमेदवार ठरवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे शिवसेनेचे उमेदवार असल्याची आधी चर्चा होती. मात्र संभाजीराजे अपक्ष लढणार असल्याचे दिसत आहे. तर शिवसेनेने आपला उमेदवार ठरवला आहे. कोल्हापुरातील कट्टर शिवसैनिक संजय पवार (Sanjay Pawar) यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आले आहे. कालपर्यंत संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचे उमेदवार असल्याची चर्चा सुरू होती. दुपारी बारावाजेपर्यंत त्यांनी निर्णय द्यावा, असे सांगण्यात आले होते. मात्र संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत.

कोण आहेत संजय पवार?

संजय पवार हे कोल्हापुरातील शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मागील जवळपास 25 ते 30 वर्षे त्यांनी शिवसेनेत काम केले आहे. ते सध्या जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. ते मूळ ग्रामीण भागातील आहेत. यावेळी ग्रामीण भागातील उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्याचे शिवसेनेने ठरवले आहे.

 

एकीकडे संभाजीराजे अपक्ष म्हणून लढणार आहेत. तर त्यांना शह देण्यासाठी सर्वांशी संवाद असलेला उमेदवार शिवसेनेला हवा आहे. त्यादृष्टीकोनातून सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे संभाजीराजे विरुद्ध संजय पवार असा सामना याठिकाणी पाहायला मिळणार आहे.

शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केलं. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते.

शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा सेनेतील त्यांचा प्रवास. उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची छाप आहे. तसेच, एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. यासोबतच, सिमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल 30 वर्षे संजय पवार सहभागी आहेत.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली. त्यामुळे शिवसेना उमेदवार देणार हे स्पष्ट झालं होतं. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि संजय पवार यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती मिळत होती. मंगळवारी टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायला मिळतील असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं.

त्यामुळे सहाव्या जागेच्या उमेदवारीसाठी मातोश्रीचा हात कुणाच्या डोक्यावर असणार याची उत्सुकता लागली होती. दुसरीकडे शिवसेनेकडून देण्यात आलेल्या पक्ष प्रवेशाच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पाठ फिरवली. त्यामुळे संभाजीराजेंची पुढची भूमिका काय असेल याकडंही लक्ष लागलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: