शाळा सुरू करायच्या किंवा नाही हा ऐच्छिक विषय – उदय सामंत

शाळा सुरू करायच्या किंवा नाही हा ऐच्छिक विषय – उदय सामंत

सांगली – शाळा सुरू करायच्या किंवा नाही हा ऐच्छिक विषय असून याबाबत कोणतीही सक्ती करण्यात आली नाही, मुंबई आणि ठाण्यातील शाळा 31 डिसेंबर पर्यंत सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यात सुद्धा तेथील प्रशासन आणि पालकांच्या मतांच्या निर्णयानुसार शाळा सुरू करायच्या अथवा न करायच्या याबाबत निर्णय घेण्यात येतील मात्र शाळा सुरू करण्याचे निर्णय निश्चित स्वरूपाचे आहेत अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

सांगली मध्ये महाविकास आघाडीच्या पदवीधर निवडणुक उमेदवारांच्या प्रचार सभेदरम्यान सामंत बोलत होते. राज्यपाल हे लोकशाही मानणारे आहेत. लोकशाहीमध्ये त्यांना महत्त्वाचा विशेषाधिकार आहे. विधान परिषदेच्या बारा जागांच्या बाबत यापूर्वी मुख्यमंत्री यांनी सुद्धा वक्तव्य केलं आहे. मला सुद्धा विश्वास आहे की येत्या काही दिवसात 12 विधानपरिषद सदस्यांची नावे जाहीर केली जातील अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: